Atal Setu Tolls News: शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. 21.8 किलोमीटरलांबीचा हा मार्ग 6 लेनचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग ठरला आहे. या पुलाच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ मागील दोन तासांपेक्षा केवळ 15 ते 20 मिनिटांवर आला आहे. (Latest Marathi News)
शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. मात्र, अटल पुलाचा वापर करण्यासाठी भरमसाठ टोल आकारण्यात येणार आहे. (Marathi News)
किती असेल टोल शुल्क
कार प्रवास : एकतर्फी प्रवासासाठी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये.
मासिक आणि दैनंदिन पासचे दर : अनुक्रमे 12500 रुपये आणि 625 रुपये.
हलकी व्यावसायिक वाहने (एलसीव्ही) आणि मिनी बस : एकतर्फी प्रवासासाठी 400 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 600 रुपये. डेली पास आणि मंथली पास : अनुक्रमे 1,000 आणि 20,000 रुपये. (Marathi Batmya)
बस आणि टू-एक्सल ट्रकसाठी: एकतर्फी प्रवासासाठी 830 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 1245 रुपये.
डेली पास आणि मंथली पास : अनुक्रमे 2,075 रुपये आणि 41,500 रुपये.
अवजड वाहनांचा टोल
मल्टी एक्सल व्हेइकल (एमएव्ही-3 एक्सल) : एकतर्फी प्रवासासाठी 905 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 1,360 रुपये. डेली पास आणि मंथली पास : अनुक्रमे 2,265 रुपये आणि 45,250 रुपये.
एमएव्ही (४ ते ६ अॅक्सल) : एकतर्फी प्रवासासाठी 1300 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 1950 रुपये. डेली पास आणि मंथली पास : अनुक्रमे 3250 रुपये आणि 65000 रुपये.
मोठी वाहने : एकतर्फी प्रवासासाठी 1580 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 2370 रुपये. डेली पास आणि मंथली पास : अनुक्रमे 3,950 रुपये आणि 79,000 रुपये