पुणे, ३० जून: प्रवाशांची वाढती वर्दळ लक्षात घेता रेल्वेने सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हरणगुळ मार्गावर विशेष रेल्वे सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या)
01435 सोलापूर – एलटीटी साप्ताहिक विशेष : 6 ऑगस्ट 2024 ते 24 सप्टेंबर 2024 पर्यंत (8 फेऱ्या) दर मंगळवारी वाढविण्यात आली.
01436 एलटीटी – सोलापूर साप्ताहिक विशेष : 7 ऑगस्ट 2024 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत (8 फेऱ्या) दर बुधवारी वाढविण्यात आली.
पुणे-कोल्हापूर डेली स्पेशल (१८४ फेऱ्या)
01023 पुणे-कोल्हापूर डेली स्पेशल : 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ (92 फेऱ्या).
01024 कोल्हापूर-पुणे डेली स्पेशल : 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ (92 फेऱ्या)
पुणे-हरणगुळ डेली स्पेशल (१८४ फेऱ्या)
01487 पुणे-हरंगुळ डेली स्पेशल: 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ (92 फेऱ्या).
01488 हरणगुळ-पुणे डेली स्पेशल: 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ (92 फेऱ्या).
आरक्षणाचा तपशील
या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांचे (०१४३५/०१४३६, ०१०२३/०१०२४ आणि ०१४८७/०१४८८) बुकिंग ३० जून २०२४ रोजी सुरू होईल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण करता येईल, www.irctc.co.in.
या विशेष गाड्यांच्या विविध थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in भेट द्यावी किंवा एनटीईएस अॅप डाऊनलोड करावे, असा सल्ला देण्यात आला आहे