पुणे, २६ जून: नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरित करण्यात आला आहे.
वाघोली परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी दहा पदरी कॉरिडॉरचे आश्वासन देणारा हा प्रकल्प आता महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली असल्याची घोषणा खासदार (Shirur News) डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. एनएचएआयने निविदा प्रक्रिया थांबवली असली तरी हा प्रकल्प जलद गतीने सुरू होण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) कायम असून, (Pune News) तो मंजूर झाल्यानंतर तीन टप्प्यांत काम सुरू राहील, अशी ग्वाही देत या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.