महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 673 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22nd March 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Vacancies In :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
जागा :
या भरती अंतर्गत 673 जागा उपलब्ध आहे
पदाचे नाव :
(1) सहायक संचालक [महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा] (2) उद्योग अधिकारी [तांत्रिक], (3) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, (4) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, (5) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, (6) निरीक्षक [वैधमापन शास्त्र], (7) अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 साठी – (i) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा (ii) इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा (iii) इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा (iv) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा (v) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
पद क्र. 2 साठी – 01) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा 02) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
पद क्र. 3 साठी – 01) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षांची पदवी 02) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.
पद क्र. 4 साठी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता 02) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 03) बी.ई. / बी.टेक.
पद क्र. 5 साठी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. 02) विद्युत अभियांत्रिकी पदवी. 03) बी.ई. / बी.टेक.
पद क्र. 6 साठी – सांविधानीक विद्यापीठाची मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी
पद क्र. 7 साठी – 01) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate). 02) केंद्रशासनाच्या मान्यतेचे अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
वयाची अट :
कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38 वर्षांपर्यंत
वेतनमान :
नियमांनुसार
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
या भरती अंतर्गत Online पद्धतीने अर्ज करायचा आहे
नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र
अंतिम दिनांक :
22nd March 2023